काही गोष्टी लक्षात राहतात, काही गोष्टी कायमच्या घर करून जातात..
त्या आठवणीच मग जपाव्याशा वाटतात..
आठवणी असतातच, पण अनुभवायचे असतात ते क्षण :)
कधीतरी असच एकांतात बसावं,
आपल्याच विचारात रमून बघावं....
जर शीण आलाच थोडा तर
चक्क झाडाखाली निवांत पडावं,
कधीतरी असं पण जगून बघावं !
आपला समोरच्याला आधार वाटावा,
लागेल तेव्हा तो हक्काने मागावा,
कधीतरी दुसऱ्यांसाठी जगून बघावं,
आणि आपल्यालाच त्यात समाधान वाटावं,
कधीतरी असं पण जगून बघावं !
कधीतरी स्वत: थोडसं adjust करावं,
थोड पडतं घेउन बघावं,
त्यात पण एक गम्मत असते,
तिचा अनुभव घेऊन पाहावं,
कधीतरी असं पण जगून बघावं !
कधीतरी हक्काने थोडं भांडून बघावं,
फार वाटलंच तर रुसुनही बसावं,
बोलून तर नेहमीच मनं जिंकतो,
एकदा अबोला धरुन जवळ येउन पाहावं,
कधीतरी असं पण जगून बघावं !
-ab
त्या आठवणीच मग जपाव्याशा वाटतात..
आठवणी असतातच, पण अनुभवायचे असतात ते क्षण :)
कधीतरी असच एकांतात बसावं,
आपल्याच विचारात रमून बघावं....
जर शीण आलाच थोडा तर
चक्क झाडाखाली निवांत पडावं,
कधीतरी असं पण जगून बघावं !
आपला समोरच्याला आधार वाटावा,
लागेल तेव्हा तो हक्काने मागावा,
कधीतरी दुसऱ्यांसाठी जगून बघावं,
आणि आपल्यालाच त्यात समाधान वाटावं,
कधीतरी असं पण जगून बघावं !
कधीतरी स्वत: थोडसं adjust करावं,
थोड पडतं घेउन बघावं,
त्यात पण एक गम्मत असते,
तिचा अनुभव घेऊन पाहावं,
कधीतरी असं पण जगून बघावं !
कधीतरी हक्काने थोडं भांडून बघावं,
फार वाटलंच तर रुसुनही बसावं,
बोलून तर नेहमीच मनं जिंकतो,
एकदा अबोला धरुन जवळ येउन पाहावं,
कधीतरी असं पण जगून बघावं !
-ab





