#VandeMataram

#VandeMataram

Pages

Friday, August 15, 2014

मानाचा मुजरा !




















अरे परकीयांचे आक्रमण थोपवून, 
स्वधर्म रक्षिला ज्यांनी,
स्वराज्याचे स्वप्न पाहुनी, 
अनेक आहुत्या दिल्या ज्यांनी,
रयतेच्या सुखासाठी, 
सुराज्याची आस जपली ज्यांनी,
धर्मरक्षणाचा ध्यास घेऊनी,
अध्यात्माचा झेंडा रोवला ज्यांनी,
शून्याचा अर्थ लावण्याजोगी ,
शास्त्रशुद्ध शोध लावले ज्यांनी,
एकीकडे सत्याचा आग्रह, एकीकडे सशस्त्र लढा,
क्रांतीच्या मशाली देशभर ज्वलंत केल्या ज्यांनी,
त्या साऱ्यांच्या वीरतेला, सत्यतेला अन त्यागाला ,
मानाचा मुजरा करितो नतमस्तक होऊनी !  


-ab
#VandeMataram
#ProudToBeAnIndian

#RahulVaidya #TributeToIndia

Sunday, August 3, 2014

मैत्री

 मैत्री म्हणजे एक नाते,
 एक असे नाते… 
 ज्याला कुठलीच सीमा नसते,
 ज्यात कुठलीच मर्यादा नसते,
 असल्याच तर थोड्याशा अपेक्षा,
 पण त्याचे ओझे मात्र नक्कीच नसते !

  मा
झ्या सर्व मित्र परिवारास हार्दिक शुभेछा !  #HappyFriendshipDay